राज्यात कोरोनाचा नवीन उपप्रकार आढळला आहे. केपी.२ (फ्लर्ट) असे या उपप्रकाराचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ९१ कोरोना रुग्णांमध्ये या नवीन उपप्रकाराचे निदान झाले आहे. त्यामुळे जे रुग्ण आधीच इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जे.एन. १ व्हेरिएंटनंतर, केपी.२ चा अमेरिकेत अधिक प्रभाव दिसून आला. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ९१ जणांमध्ये नवीन उपप्रकाराचे निदान झाले असून त्यात पुण्यातील ५१, ठाणे २०, अमरावती ७, छत्रपती संभाजीनगर ७, सोलापूर, अहमदनगरमधील २ रुग्णांचा समावेश आहे.
लातूर, नाशिक आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नवीन सब-व्हेरिएंटचा एकही रुग्ण मुंबईत आढळलेला नाही.