
10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांसाठी 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपला. आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी लोकसभेच्या सर्व २५ आणि विधानसभेच्या सर्व १७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात आरक्षण, तुष्टीकरण धोरण, भ्रष्टाचार आणि रोजगार या मुद्दय़ांनी गाजल्या. या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव (कनौज-यूपी), केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग (बेगुसराय-बिहार) आणि नित्यानंद राय (उजियारपूर-बिहार), काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (बेहरामपूर-पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.