
बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विद्यमान खासदार डॉ. प्रितमताईच्या माध्यमातून, पंकजाताई मुंडे यांच्या एका पत्रावर कोट्यावधी रुपयांचे रस्ते मंजूर करणारे ज्यांनी आपला जिल्हा दळणवणनाच्या दृष्टीने गल्ली ते दिल्ली नेऊन ठेवला. तेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिनांक 10 रोजी दुपारी 12.00 वाजता माजलगाव येथील मोंढा मैदानावर प्रचंड जाहीर सभा होणार असून, मतदार संघातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केले.
बीड लोकसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासाठी गडकरींची विजय संकल्प सभा शहरात होत आहे. जिल्ह्यात लहान थोरापासून घर बसल्या गडकरिंची ओळख सर्वाना आहे. त्याचे कारण संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील रस्त्याच दारिद्र्य त्यांनी खऱ्या अर्थाने कायमचे फेडून टाकले. मागच्या पाच वर्षात खासदार म्हणून प्रीतमताई मुंडे यांनी पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपयाचे रास्ते विकासाची कामे जिल्ह्यात करून दाखवली. विशेष म्हणजे पंकजाताईच्या एका पत्रावर हाजारो कोटी रुपयाचे रस्ते विकास आणि राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून घालवले. चेहरा आपण ज्या आरशात पाहतो त्याप्रमाणे आता चेहरा खऱ्या अर्थाने रस्त्यात पाहावा असे स्वछ आणि जिल्ह्यात बांधले. विरोधकांच्या सुसाट गाड्या ज्या रस्त्यावरून जातात ते संपूर्ण रस्ते जिल्ह्यात मुंडे भगिनिणी केले याची जाणीव सामान्य जनतेला आहे. म्हणूनच आम जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहताना दिसते. असा रस्ते विकास करणारे ज्यांना गडकरीचे रोडकरी असे म्हटल्या जाते, ते केंद्रीय मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवडणू द्यावे म्हणून मतदारांचा आशीर्वाद मागण्यासाठी जिल्ह्यात येत असून, माजलगावात दुपारी 01 वाजता होणाऱ्या सभेला जनतेने उपस्थित राहावे. असे आवाहन अरुण राऊत यांनी केले. या सभेला उमेदवार पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ.प्रकाशदादा सोळंके,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेशराव आडसकर, बाबुराव पोटभरे, मोहनराव जगताप, डॉ. प्रकाश आनंदगावकर, राम कुलकर्णी, जयदत्त नरवडे, तालुका प्रमुख तुकाराम बापू येवले, धोंडीराम जाधव, मुफ्तीराम आबुज, राकेश साळवे, अविनाश जावळे आदि उपस्थित राहणार आहेत.