

महायुतीच्या उमेदवार पंकजाताईच्या विजयासाठी उहोणारद्या उद्या आंबेजोगाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा .′
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार ..!
लाखोंच्या संखेने सभेला उपस्थित राहा – खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. सौ. नामिताताई मुंदडाचे आवाहन
बीड दि 05 ( प्रतिनिधि )
बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयावर शिक्का मोर्तब करण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा उद्या दिनांक 7 रोजी सायं 03.00 वाजता अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या भव्य मैदावर आयोजित करण्यात आली असून, बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे व केजचे आ. सौ. नामिताताई मुंदडा यांनी केले. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
जाहीर सभेच्या संदर्भात प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरात सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, लाखोंच्या संखेने उपस्थिती लक्षात घेऊन तशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आली. देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बसणार आल्याने त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सर्व स्तरातून जनसमुदाय येणार. निवडणूक प्रचाराचा दूसरा टप्पा सुरू असून, विकासाचा मुद्दा प्रभावी ठरत असल्याने पंकजाताईंना संपूर्ण जिल्ह्यात आघाडी मिळत असून, आपण निवडणुन दिलेल्या खासदारांची थेट पंतप्रधानाच्या सोबत उठ बस होणार त्यातच आपल्या जिल्ह्याचे भाग्य उजाळल्याशीवाय राहणार नाही आशा प्रकारचा विश्वास संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा खऱ्या अर्थाने पंकजाताईच्या विजयावर शिका मोर्तब करणारी असून, या सभेला बीड जिल्ह्यातील महायुतीचे सर्व घटक पक्ष, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती रहाणार असल्याचे पत्रकात म्हटले.
मनोहर आंबा नागरी तथा तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतून शिवाय संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेने, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव यांनी मोठ्या संखेने सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.