
बीड दि26 (प्रतिनिधी)स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक महान भारतीय क्रांतिकारक, विचारवंत आणि हिंदुत्ववादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमधील त्यांचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी मानला जातो. सावरकर हे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी नव्हते, तर ते एक प्रखरे राष्ट्रभक्त, समाजसुधारक, कवी आणि तत्त्वज्ञ होते असे विचार प्र प्राचार्य आर डी सय्यद यांनी व्यक्त केले .
ते वंसतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय आणि संभाजीराजे ग्रंथालयशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीडच्या वतीने स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० वी पुण्यतिथी निमित्त आयोजिक कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास एम सी जे विभाग प्रमुख प्रा शिवशंकर पटवारी, प्रा सुहास गाढवे, प्रा अतूल रसाळ, श्री दिपक जाधव, सौ संध्या खोसे, मंगेश खराडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी पुण्यात ‘अभिनव भारत’ या गुप्त संघटनेची स्थापना केली आणि परदेशी कापडांची पहिली जाहीर होळी केली. त्यांना दोनवेळा जन्मठेपेची (५० वर्षे) काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना त्यांनी कोळशाने भिंतीवर महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर रत्नागिरीत स्थानबद्धतेच्या काळात जातिभेद निर्मूलनासाठी ‘पतित पावन मंदिर’ स्थापन करुन सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते असे सांगीतले.