- पत्रकारितेत ए आय च्या माध्यमातून बातम्या, लेख, जाहिराती, छायाचित्र किंवा दृकश्राव्य माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या बातम्या मिळवणे आणि त्या संपादित करणे हे एक आय व्दारे पत्रकारितेचे क्षेत्र समृद्ध करण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो असे प्रतिपादन ग्वाल्हेर येथील आय टी एम विद्यापीठाच्या एमसीजे विभागाचे प्रमुख डॉ मनीष कुमार जैसल यांनी केले .
ते आज वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एमसीचे विभागाच्या वतीने आयोजित ॲड ऑन कोर्सच्या एका सत्रात आभासी प्रणाली द्वारे बोलत होते.
यावेळी त्यांनी ए आय हे मानवी कौशल्याला पूरक असून मानवाने ए आयचा वापर सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाकरिता केला तर तो निश्चितच एका विकासात्मक अवस्थेकडे घेऊन जाणारा असेल. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कोणत्याही ए आय प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्याला आवश्यक असणाऱ्या बातम्या, ऑडिओ, व्हिडिओ ,छायाचित्र योग्य प्रकारे नैतिकतेच्या कसोट्यावर खरे उतरणारे साहित्य निर्माण केले तर ए आय हे मानवासाठी वरदानच ठरेल असे देखील सांगितले.
भारताने ए आयच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून सध्या देशात ए आय संदर्भात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात जगातील अनेक देशाने सहभाग घेतला असल्याचे देखील त्यांनी सांगितले .त्यामुळे आगामी काळात ए आयच्या माध्यमातून ज्यांनी कौशल्य आत्मसात केली ते निर्विवादपणे पत्रकारितेत कायम राहू शकतात असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य आर डी सय्यद यांनी त्यांचे स्वागत केले .तर विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी यांनी त्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी बीएएमसीजे बी जे आणि एम ए एमसीजे चे विद्यार्थी ऑनलाइन मिटिंग मध्ये सहभागी झाले होते.