बीड : येथील वसंतराव काळे पञकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने “IT क्षेत्रातील देश विदेशातील करिअर च्या संधी ” या महत्त्वपूर्ण विषयावर व स्पर्धा परीक्षा संदर्भात IIT मधून उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी, उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व असलेले IPS मा.नवणीतजी कांवत सर ( पोलीस अधीक्षक बीड ) व सायबर क्राईम या संदर्भात PhD संशोधन करणारे ACP मा.श्रीकांतजी डिसले सर यांच्यासह पुणे येथील IT क्षेत्रातील आंतराष्ट्रीय कंपनींचे सन्मानीय अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवार दि.19 जूलै रोजी 10:30 वा वसंतराव काळे पञकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय अमन प्लाझा बार्शी रोड बीड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
बीड व अन्य शहरातील आय टी क्षेत्रात करीअर करु इच्छिणारे विद्यार्थी, बी सी ए,बी सी एस, बी एस्सी कॅम्पुटर, बीई पास विद्यार्थी या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होवू शकतात. प्रवेश विनामुल्य असून विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध कंपनीतील उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी जाणून घेण्याची संधी यावेळी मिळणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक नवणीतजी कांवत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा श्री रमेशभाऊ पोकळे असणार आहेत
कार्यशाळा दिवसभर चाालणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांच्या ईमेलद्वारे पाढवली जाणार आहेत..
कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
देश विदेशातील करिअर च्या संधी : .19 जूलै रोजी कार्यशाळा
Leave a comment
Leave a comment