वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी आर. डी. सय्यद रुजू
बीड: येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी आर.डी.सय्यद यांची प्राचार्यपदी कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेने नेमणूक केली असून त्यांनी आजपासून पदभार स्वीकारला आहे. प्रा. प्राचार्य आर. डी. सय्यद यांनी सौदी अरेबिया येथील किंग सऊद विद्यापीठ येथे संगणक शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून बारा वर्षापेक्षा अधिक काळ काम केले आहे.
ते संगणक क्षेत्रातील तज्ञ म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा या महाविद्यालयास विकासासाठी निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे सचिव तथा प्रजा. प्राचार्य श्री गणेश पोकळे यांनी व्यक्त केले. त्यांना संस्था अध्यक्ष श्री रमेशभाऊ पोकळे यांनी शुभेच्छा दिल्या. वेळी प्रा. शिवशंकर पटवारी प्रा सुहास गाढवे , प्रा कोमल सुरवसे, प्रा. पल्लवी जगताप श्री महेश नेवडे, सौ. संध्या खोसे, सचिन चौरे, नागनाथ खोड यांची उपस्थिती होती.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी आर. डी. सय्यद
Leave a comment
Leave a comment