विकसित भारत युवा नेतृत्व संवाद हा एक भव्य कार्यक्रम आहे जो 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान भारताची राजधानी दिल्लीतील भारत मंडपंम् येथे आयोजित करण्यात येत आहे.यामध्ये विविध देशातील आणि भारतातील प्रमुख तरुण नेता, शासकीय अधिकारी, शैक्षणिक तज्ञ, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभाग असेल.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या तरुण पिढ्यामध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणे आहे स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित, यांचा आत्मविश्वास नेतृत्वाचे वादळ आणि समाज परिवर्तनाचे ध्येय मांडण्यात येईल. ‘विकसित भारत’ या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी युवकांना सामाजिक आणि आर्थिक विकासात सहभाग घेण्याची संधी मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे.विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यावर चर्चा योगदानावर चर्चा करणे ,आणि विकासाच्या दिशेने नवे विचार समोर आणणे ,या सत्रात केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती असेल तसेच, स्वामी विवेकानंद यांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर आधारित विशेष सादरी करणे, आणि भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी विचार मांडले जातील. ‘विकसित भारत: युवा नेतृत्वाची भूमिका’ या प्रमुख थीमवर विविध चर्चे क्षेत्र आयोजित केली जातील.यामध्ये नेतृत्व तंत्रज्ञान पर्यावरण महिला सक्षशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट शाश्वत विकास कृषी आणि स्टार्ट अप्स यावर चर्चा होईल. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.जो भारताच्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी तयार करतो या संवादाचा मुख्य उद्दिष्ट तरुणांमध्ये नेतृत्वाची गुणवत्ता जागरूकता आणि प्रेरणा निर्माण करणे.स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या कार्यक्रमांमध्ये तरुणांना भारताच्या समृद्ध भविष्यासाठी सक्रियपणे योगदान देण्याचे उद्दिष्ट साधले जाते.
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद हा एक ऐतिहासिक मंच आहे जिथे तरुण नेत्यांना त्यांच्या नेतृत्व क्षमतांचा अभ्यास समाज आणि परिष्कृत करण्याची संधी मिळते. विविध चर्चासत्र,कार्यशाळा आणि संवाद सत्राच्या माध्यमातून या नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण शिकवण मिळते स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानात दाखवलेल्या आदर्श नेतृत्वाचे पालन करणारे युवा भारताच्या विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभवू शकतात.
‘विकसित भारत’ हा एक महत्त्वपूर्ण लक्ष आहे ,आणि त्याची साध्यता त्यावेळीच शक्य आहे जेव्हा युवा पिढीचे योगदान प्रभावी होईल. या कार्यक्रमाद्वारे युवा नेत्यांना भारताच्या दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी उपयुक्त उपाय आणि तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान मिळते. पर्यावरण, कृषी पोषण, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रामधील कार्यप्रणवता यावर चर्चा केली जाते. यामुळे तरुणांना स्वतःचे कार्यक्षेत्र आणि त्यांच्या विकासासाठी त्यांचे योगदान अधिक समजून उमजते. विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचा एक प्रमुख पैलू म्हणजे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या कार्यक्रमात आणि कार्यशाळा तंत्रज्ञानाचा विविध पैलू वर. आणि नवोन्मेष या कक्षेत कसे कार्य करावे यावर केंद्रित केल्या जातात. एक नवीन विचारधारा जोपासून, तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी देशातील सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे समाधान कसे करू शकतात हे शिकवले जाते. युवा पिढीला श्वास्वत आणि विकास मूक तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पना साकारण्याची प्रेरणा दिली जाते. कार्यक्रमाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे जागतिक संवाद विविध देशातील युवा नेत्यांना एकत्र आणून विचारांची देवाण – घेवाण केली जाते.यामुळे भारतीय युवकांना जागतिक समस्यावर तज्ञा सोबत चर्चा करण्याचे आणि जागतिक पातळीवर भारताच्या भूमिका आणि दृष्टिकोनाचे परिषकृत आकलन मिळवण्याची संधी मिळते .एकाच ठिकाणी विविध देशाच्या सांस्कृतिक सामाजिक, आणि तांत्रिक दृष्टिकोनाची तुलना करून, युवा विचारवंत अधिक व्यापक दृष्टिकोनातून समस्यांचा समाधान शोधू शकतात. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक विषयाचे महत्त्व समजावले.जाते विशेषता गरीब आणि वंचित वर्गातील व्यक्तींच्या उत्थनासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक योजनांचा विचार केला जातो या सत्रामध्ये, युवकांना सामाजिक प्रत्येक घटकाचे सक्षशक्तीकरण करण्याची शुद्ध दृष्टिकोन मिळतो. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद हा एक अत्यंत प्रभावी कार्यक्रम आहे जो भारतीय युवकांना केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि नेतृत्वाची क्षमता विकसित करण्याची संधी देतो, तर त्यांना भारताच्या विकास प्रक्रियेत सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करतो हे संवाद विविध क्षेत्रातील समस्यावर विचारवंत ,तज्ञ उद्योगपती ,आणि राजकीय नेत्यासोबत संवाद साधण्याचा आणि एकत्रितपणे भारताच्या समृद्ध भविष्याची दिशा ठरवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
*कु. अदिती विक्रम डावकर*
B
. A. M. C. J. IYear