
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उद्या (1 जून) सातव्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी निकाल हाती येतील. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर दाखवले जातील.
वृत्तवाहिन्यांवर या निकालांवर चर्चा सुद्धा होईल. मात्र, काँग्रेस पक्षाने या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत एक्झिट सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्झिट पोलच्या माध्यमातून बेटिंग मार्केटवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे पक्ष 4 जूनला निकालाची वाट पाहणार आहे.