बीड – समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचे महान कार्य येथील संतांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन जाण्यामध्ये अनेक संत-महंतांचे योगदान आहे. श्री. बंकट स्वामी महाराज यांनी वारकरी संप्रदायामध्यमातून महाराष्ट्रतील समाजाला योग्य मार्ग दाखविणारे महान संत आहेत. असे प्रतिपादन श्री. बंकट स्वामी शिक्षण संस्थाचे सचिव श्री. मच्छिंद्र घरत यांनी केले आहे. येथील श्री. बंकट स्वामी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये श्री. बंकट स्वामी महाराज यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष प्रा. गणेश पोकळे, दत्ता जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना घरत म्हणाले की, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. अनेक संत-महंतांनी आपले पुर्ण जीवन समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे. असे महान कार्य श्री. जगदगुरु बंकटस्वामी महाराज यांनी समाजाच्या कल्याणासाठी केली आहे, असेही घरत म्हणाले. या कार्यक्रमाला सुपेकर सर,श्री. महेश नेवडे, विकास, बंडू सोनवणे आदी उपस्थित होते.
बंकट स्वामी महाराज वारकरी सांप्रदायातील महान संत – श्री. मच्छिंद्र घरत.
Leave a comment
Leave a comment