
मतदानानंतर काही दिवसांनी अंतिम मतदानाची टक्केवारी वाढल्याचे कारण देत, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयातअज केला हेाता तयावर न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले. अर्जात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बदलण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या न्यायालयाच्या उन्हाळी सुटीत सुट्टीतील खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार आहे. एडीआरने आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणूक आयोगाला मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाला थोडा वेळ द्यावा, असे सरन्यायाधीश म्हणाले. खंडपीठाने निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या एक दिवस आधी 24 मे रोजी सुट्टीतील खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध केले.