
चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक मतदान झाल आहे. त्यामुळे मतदानाचा वाढलेला हा टक्का मतदाराने कोणाच्या पारडय़ात टाकला याच्यावरून कार्यकर्त्यात प्रचंड आकडेमोड सुरू असून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात कोण बाजी मारेल याविषयी गावातल्या कट्ट्या पासून ते शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये खमंग आणि सुरस चर्चा सुरू आहेत.
जातीची समीकरणे, नेत्यांच्या नाराजी नाट्य आणि बीड जिल्ह्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव या सर्वांचा एकत्रितपणे परिणाम बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होणार अशी चर्चा जवळपास प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत आहे