बीड जिल्हा सध्या मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनले आहे. तर, नांदेड जिल्ह्यातही मराठा समाजा नेत्यांच्या सभास्थळी थेट प्रश्न विचारत आहे. यापूर्वी, भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत नांदेड जिल्ह्यातील जांब गावात मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले होते.
भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे भाजपाला का मतदान करावं, तुम्ही आम्हाला कारणे सांगा, असे म्हणत येथील मराठा समाज आक्रमक झाला होता. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना अडवून समाज बांधवांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार मग आरक्षणात देण्यास अडचण का?, आपले खासदार भाजपाचे आहेत मग त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही? अंतरवली सराटीमध्ये झालेल्या अमानुष मारहाणी बद्दल तुम्ही गप्प का? असे प्रश्न करत मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी भाजपा आमदाराचा ताफा अडवला. लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील घटनेचा व्हिडिओ समोर आला असून मराठा समाजाकडूनही या व्हिडिओचे समर्थन केले जात आहे.
Discussion about this post