छत्रपती संभाजीनगर,: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ.विजय फुजारी ’कर्नल कमांडंर’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. महात्मा फुले सभागृहात बुधवारी (दि.११ ) सकाळी अत्यंत शिस्तीत व थाटात हा सोहळा संपन्न झाला.
केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने हा सकाळी ९ :३० ते १०:३० या दरम्यान हा कार्यक्रम झाला.
मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर प्रारंभी राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने मा.कुलगुरु यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर महात्मा फुले सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने हा सकाळी ९ :३० ते १०:३० या दरम्यान हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास एनसीसी छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए.जी.बारबरे, कमांडिंग ऑफीसर कर्नल बीपीएस ठाकूर, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. कर्नल बीपीएस ठाकूर यांनी ब्रिगेडियर अनुप बारबरे यांचा परिचय करुन दिला. तर मा.कुलगुरु यांचा कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी परिचय करुन दिला. यावेळी ब्रिगेडियर ए.जी.बारबरे यांनी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांना ’कर्नल कमांडंट’ उपााधी तसेच महासंचालक लेप्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांचे पत्र सुपूर्द केली. तसेच बॅटन ही सन्मानपूर्वक प्रदान केले. यावेळी ब्रिगेडियर अनुप बारबरे म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेना ’एकता और अनूशासन’ हे ब्रिदवाक्य घेऊन सहा दशकांपासून कार्यरत आहे. मा.कुलगुरु यांनी राष्ट्रीय छात्र सेनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सदर उपाधीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना, लष्करात भरती होऊन देश सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. एनसीसी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.डॉ.माधुरी सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरु यांचे कुटूंबिय सौ.छाया, डॉ.आकाश व डॉ.अस्मिता हे उपस्थित होते. यावेळी विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिकारी, संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते. अत्यंत शिस्तीत व दिमाखात सोहळा संपन्न झाला.
सन्मानप्राप्त झाल्याबद्दल मा.कुलगुरु यांचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच अधिका-यांच्यावतीने डॉ. कैलास पाथ्रीकर व सहकारी यांनी स्वागत केले.
सन्मान विद्यापीठाला समर्पित : मा.कुलगुरु

राष्ट्रीय छात्र सेनेने दिलेला हा सन्मान केवळ माझ्या पुरताच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बहुमान आहे. हा सन्मान विद्यापीठाला समर्पित करतो, असे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ’शिस्त व समर्पण’ अंगी शिस्त असणे गरजेचे आहे. गेल्या दीड वर्षात विद्यापीठाला शिस्त लाऊन योग्य दिशेने नेता आले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
*सोबत फोटो*
कॅप्शन : ब्रिगेडियर अनुप बारबरे यांनी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांना ’कर्नल कमांडंट’ मानद पदवी व बॅटन देऊन सन्मानित केले.प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, कर्नल बीपीएस ठाकूर आदी.