
आदित्य ठाकरे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना पुन्हा भाजपाबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. याप्रश्नाचं उत्तर देताना, “भाजपाला या देशातील लोकशाही संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना, “अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांची भाजपा आणि आताची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या भाजपाने प्रकाश मेहता, विनोद तावडे, पुनम महाजन अशा कितीतरी नेत्यांना बाजुला काढलं आहे. खरं तर वाजपेयी, आडवाणी, प्रमोद महाजन यांची भाजपा विश्वासार्ह होती.