By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > राज्य > सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करा
राज्य

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करा

Beedlive Team
Last updated: March 10, 2026 6:45 pm
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक, व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहु-फुले-आंबेडकर पारितोषिक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारासाठी अर्ज करीत आहेत, त्या वर्षासाठी विहित केलेल्या अटी व पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुरस्काराच्या पात्रतेचा कालावधी ०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर असा विचारात घेतला जाईल. उदाहरणार्थ, सन २०२४-२५ साठी पात्रतेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ असा राहील. इच्छुक व पात्र स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज १५ मार्च २०२६ पर्यंत संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात सादर करण्यात यावे. पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://sjsa.maharashtra.gov.in तसेच प्रस्तुत कार्यालयाच्या socialjusticelatur.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

समाजसेवी संस्था व व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

राज्य

डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा

By Beedlive Team
राज्य

संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व : मनोजदादा जरांगे पाटील

By Beedlive Team
राज्य

वारसा जपणारा संवेदनशील लोकनेता- विक्रम वसंतराव काळे

By Beedlive Team
राज्य

एस टी तर्फे विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?