माझे कौटुंबिक स्नेही, सहृदयी योद्धा, सामाजिक चळवळीत अग्रेसर नेतृत्व, राजकारणात राहूनही अत्यंत स्वच्छ, पारदर्शी आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व मा.रमेशभाऊ पोकळे यांचा आज वाढदिवस. चांदेगावसारख्या छोट्याशा गावातून भाऊंचा प्रवास सुरू झाला. भाऊ आपण अनेक वर्ष राजकारणात काम करत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान दिले. बीड सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता, संगणकशास्त्र यासारखे महत्त्वाचे महाविद्यालय स्थापन करून शेकडो विद्यार्थी घडवायचे महान कार्य आपण केले. राजकारणात सक्रिय असताना अनेक भागात विकासाची गंगा घेऊन गेलात. राजकारण आणि समाजकारणात अत्यंत मौलिक असे योगदान दिले. राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावी असतानादेखील राजकारणाला बाजूला सारत आज सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात आपण देत असलेले योगदान समाज कधीही विसरणार नाही. पुणे सारख्या अत्यंत महत्वाच्या शहरात आपण उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी आम्हा तरुणांना मार्गदर्शन घडविणारी आहे. हिंजवडी सारख्या अत्यंत समृद्ध आणि तंत्रज्ञानाने प्रगत अशा आयटी पार्क भागात आपण उभा करत असलेले प्रोजेक्ट जबरदस्त आहेत. ग्रामीण भागातून गेलेला आमचा कोहिनूर तिथे अगदी शोभून दिसतो. सुपारीच्या खंडाचेदेखील आपल्याला व्यसन नाही. चारित्र्य आणि नित्तिमत्तेच्या जोरावर आपण गाजवलेले कर्तृत्व मराठवाड्यातील तरुणासाठी एखाद्या दीपस्थंभासारखे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर वाटचाल करून जीवनाचा मार्ग तयार करणारे आपण खरोखरच ग्रेट आहात. आजचा आपला वाढदिवस आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण आयुष्यभर इतरांना देत आलात. कुणाला आनंद दिला. कुणाला आमदार होण्यासाठी साथ दिली, कुणाला खासदारकीसाठी साथ दिली. तुम्ही कधीही कुणाचा द्वेष केला नाही. तुम्ही फक्त देत आलात. आजही सर्वांना भरभरून देत आहात. तुम्ही ज्यांच्यासाठी खूप काही केले त्यांनी मात्र त्यांना द्यायची वेळ आल्यावर हात आखडते केले. तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. तुम्ही दिलदार आणि विशाल हृदयाचे आहात.
प्रामाणिकपणा आणि नित्तिमत्तेवर विश्वास असलेले लोक कुणाच्याही आधारावर जीवन जगत नाहीत. नवनिर्माणाची ताकद त्यांच्यात असते. शून्यातून विश्व साकारण्याची कला त्यांच्यात असते. अशाच ध्येयवादी, प्रयत्नवादी आणि जिद्दी लोकांत तुमची गणना होते.
संकटे, वादळे आली पण रमेश पोकळे नावाचे जहाज कधीही डगमगले नाही. शेतकरी कुटुंबातून पुढे येत भल्या-भल्याना जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवले. विद्यार्थी चळवळ, विद्यापीठातील चळवळ, शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठविणारी चळवळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही उठविलेला आवाज कुणीही विसरणार नाही. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपण दिलेले योगदान अनेकांच्या जीवनाचा आधार बनले आहे.
तुमच्याविषयी कितीही लिहिले तरी लिहून पूर्ण होणार नाही. माणूस म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहात. माझ्या आयुष्यात भेटलेल्या खास माणसांपैकी आपण एक आहात. आजच्या या आपल्या वाढदिवसाच्या सुवर्णक्षणी खूप शुभेच्छा. आपल्या जीवनात शतानंदाचा मोगरा सदैव बहरत राहो हीच सदिच्छा.
: ज्ञानदेव काशिद, बीड
९९७०७४३६०४