
मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केले.
रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीराने शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा होत्या.वायकर यांच्या वक्तव्याने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटानेही वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना