दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर अनेक वर्षांपासून पक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना डावलण्यात आले,असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
नंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे
रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिला. महायुतीच्या रक्षा खडसे उमेदवार आहेत. यामुळे रावेरमध्ये दोघांमध्ये ही सरळ लढत होणार आहे