स्वकर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास आणि त्याला मिळालेली विद्वत्तेची जोड, सतत सर्वसामान्यासाठी संघर्ष हेच ध्येय ठेवून कार्यरत असले रमेशभाऊ पोकळे यांना मराठा समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. रमेशभाऊ संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे वेगळेपण दिसून येते. कोणत्याही विषयाचे वस्तुनिष्ठ आकलन, मुद्देसूद मांडणी हे त्यांचे काही विशेष पैलू आहेत. रमेशभाऊंचा इतिहास अभ्यासल्यास असे लक्षात येते की, विद्यार्थी असल्यापासुन सतत मराठा सेवा संघाच्या कामात पुढाकार घेवून चळवळीत काम केले आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ मराठा समाजातील नाही. तर इतर समाजातील जे जे विद्यार्थी त्यांच्याकडे येतील त्यांना मदत केली आहे. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. रमेशभाऊनी पत्रकारिता महाविद्यालयाच्या माध्यमातुन बीड जिल्ह्यात नवीन तरुण पिठी उभा करण्याचे कार्य केले आहे. जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे प्रश्न निर्मिण झाले तेव्हा तेव्हा राजकीय गणिते बाजूला ठेवून मराठा समाजाच्या प्रश्नावर रमेशभाऊंनी काम केले असल्याचे दिसुन येते.
प्रत्येक ध्येय वेड्या युवकासाठी रमेशभाऊ आयकॉन आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजवर कोणत्याही प्रश्नावर आक्रमक रूप धारण करताना आणि विरोधकावर कडाडून हल्ला चढवतानाही त्यांनी कोणावर टोकाची टीका केली नाही किंवा अश्लील भाषेचा वापर केला नाही.
राजकारणाच्या चिखलात राहूनही रमेश पोकळे यांचे चारित्र्य स्वच्छ-निष्कलंक राहिले आहे. चारित्र्याचा मोठा दरारा विरोधकांवर असतो. व्यक्तिगत जीवनात त्यांनी कधीही आपले राजकीय विचार येवू दिलेले नाहीत. अनेक पक्षातल्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे निकटचे, मैत्रीचे संबंध आहेत. लोकसंग्रह आणि सर्वांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची हातोटी आहे. अत्यंत आक्रमकपणे पण संयमाने बोलणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. जाहीर सभांत बोलताना ते कधीही विरोधकांची व्यक्तिगत निंदा-नालस्ती करीत नाहीत. त्यामुळेच विरोधकांनाही त्यांचा दरारा वाटतो. चांगल्या लोकांनी चांगल्या उद्देशाने राजकारणात यावे असा त्यांचा आग्रह असतो. चारित्र्य सांभाळणारे नेतृत्व असा त्यांचा लौकिक आहे.
उत्कृष्ट जनसंपर्क हे रमेश पोकळे यांचे महत्त्वाचे भांडवल आहे. त्याच्या बळावर त्यांची आजवरची राजकीय, सामाजिक जीवनातील वाटचाल यशस्वी झाली आहे. रमेशभाऊ पोकळे यांना मराठा समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. हा केवळ रमेशभाऊंचा एकट्याचा गौरव नाही. तर रमेशभाऊंना प्रत्येक चळवळीत, आंदोलनात, समाजकारणात आणि राजकारणात कायम पाठीशी रहाणार्या प्रत्येक कार्यकत्यांचा गौरव आहे. रमेशभाऊंच्या हातुन मराठा समाजाची अशीच सेवा व्हावी. त्या बरोबर मराठवाडा आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी लाभावी एवढीच अपेक्षा आहे.
प्रा. विठ्ठल एडके