ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागांवर ‘फिक्सिंग’ केल्याचा गंभीर आणि सनसनाटी आरोप केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणायासह २० जागांवर महाविकास आघाडीने ‘फिक्सिंग’ केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सनसनाटी आरोप केला.
ओबीसी आणि जरांगे फॅक्टर काम करणार
निवडणूक निकाल काय लागेल असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आताच लावता येणार नाही. कारण या निवडणुकीवर मनोज जरांगे आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. ३० टक्के मराठा मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे. मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.