बीड : हा सन्मान केवळ माझ्यासाठी एक गौरवच नाही, तर तो मला शिक्षण क्षेत्रात अधिक प्रभावीपणे योगदान देत राहण्यासाठी एक प्रेरणास्रोत आणि एक जबाबदारी देखील वाटतो असे विचार प्रा गणेश पोकळे यांनी मराठवाडा एज्यूकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सत्काराला उत्तर देतांना मांडले
छत्रपती संभाजीनगर येथील ‘हॉटेल ट्रीट इम्पीरियल’ येथे एका विशेष समारंभात नवभारत आणि नवराष्ट्र गु्रपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सत्कार समारंभात, मराठवाडा एज्यकेशन आयकॉन या पुरस्काराने कॅ अण्णसाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे सचिव प्रा गणेशजी पोकळे यांना मा.आ. व्रिकमजी काळे, मा. मंत्री अतूलजी सावेयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. श्रीवास्तव ,नवभारत ग्रुप’चे श्री. कल्याणजी पांडे आणि इतर अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
त्यांना हा प्रतिष्ठीत पुरस्कार आज प्रदान करण्यात आला तो ‘नवराष्ट्र समूह’ (ज्याचा उल्लेख अनेकदा व्यापक ‘नवभारत समूहाचा’ एक भाग म्हणून केला जातो) हे भारतातील एक अग्रगण्य माध्यमगृह आहे; हे प्रामुख्याने आपल्या ‘नवराष्ट्र’ या मराठी भाषेतील दैनंदिन वृत्तपत्रासाठी ओळखले जाते. नवराष्ट्र हे मराठी वृत्तपत्र २००० साली सुरू झाले असून मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरातून हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाते आणि ग्रामीण महाराष्ट्रातही या व्याप्ती अत्यंत विस्तृत आहे.
प्रा गणेश पोकळे यांनी कै अण्णसाहेब पाटील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या तीन महाविद्यालये आणि एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे खूली केली.अनेकांना माध्यमाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध केल्याने बीडमध्ये असंख्य चांगले पत्रकार निर्माण होवू शकले.