
सिंचन घोटाळ्यामध्ये मागच्या दहा-बारा वर्षांपासून होत असलेले आरोप ज्यात अजित पवार, सुनील तटकरे आणि अन्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात होते. हे आरोप देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी सुद्धा केले होते. सिंचन खात्याचे मंत्री असताना जी कंत्राट दिली ती देताना नियम आणि अटी बदलण्यात आले. हे आरोप खरे होते असं म्हणून त्या संदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर वरील सर्व नेत्यांना दोष मुक्त करण्यात आल्यामुळे आरोपात तथ्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे.ते मुलाखतीदरम्यान बोलत होते