
विद्यमान खासदार, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. अशातच अहमदनगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतेय. सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत.
त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरीत्या भाजपचा राजीनामा देणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर या शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा इशारा दिला आहे.