धाराशिव लोकसभेच्या जागेवरून शिवसेन शिंदे गट आक्रमक झाला आहे. धारशिवची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे.
त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बार्शीचे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी केली आहे. शिवसेनेकडून धनाजी सावंत यांना किंवा मला उमेदवारी द्यावी असेही आंधळकर म्हणाले.
आंधळकर यांनी आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंधळकर म्हणाले की, ही राजकीय भेट नाही. मी आंबेडकरांकडे वेगळ्या कामासाठी आलो होतो, अशी माहिती आंधळकरांनी दिली. दरम्यान, आंधळकर धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आंधळकरांनी याबाबत नकार दिला. मी सच्चा शिवसैनिक असल्याचे त्यांनी सांगितले.