
अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा समावेश असल्याचे सुत्रांकडून मिळाली आहे.
वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ वाशिम रोडवर हा अपघात झाला आहे. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.