
श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था खडकीघाट, ता. जि. बीड संचलित जोगानंद विद्यालय पारगाव ( घु.)ता पाटोदा शाळेला संस्था सचिव श्री मच्छिंद्र घरत यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी त्यांना शाळेच्या विकासासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी सचिव श्री मच्छिंद्र घरत यांनी शाळेत आवश्यक त्या सर्व सुविधा लवकरच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी शिक्षकांनी तांत्रिक साधने वापरून शिक्षण अधिक सुलभ होईल असे याकडे लक्ष वेधले. या प्रसंगी वाघमारे मॅडम, बी. व्ही. अहिरे, घुमरे मॅडम, हक्कदार सर, खोसे आणि कराड सर उपस्थित होते.