

बीड :मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दि. 21/2/2025 वार शुक्रवार रोजी ठीक सायं. 7 वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड या ठिकाणी संपन्न होत आहे.कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक व उद्योग क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे रमेश भाऊ पोकळे तर वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.शरद शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाजभूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी प्रसिद्ध विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्धघाटक बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शिवश्री अशोक थोरात साहेब तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री डॉ.ज्ञानेश मोकाटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे असून प्रमुख उपस्थिती मध्ये शिवश्री एल.पी.गळगुंडे जिल्हा कोषागार अधिकारी बीड,शिवश्री चंद्रकांत शेळके तहसीलदार बीड,शिवश्री प्रवीणकुमार वानखेडे गटविकास अधिकारी बीड,शिवश्री अशोक ठाकरे विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ यांची उपस्थिती राहणार आहे.या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये शिवश्री रमेश पोकळे,शिवश्री डॉ शरद शिंदे यांना मराठा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठाभूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.