
लोकसभा निवडणुकीसाठी देशात पहिला टप्पा पार पडला.या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.
सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या 92 जागांवरही आज मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदानाचा फायदा कोणाला होणार? राजकीय जाणकारांच्या मते, सर्वसाधारणपणे जास्त मतदान किंवा मतदानाची टक्केवारी वाढणे हे सत्ताधारी पक्षाविरोधातील जनक्षोभ म्हणून पाहिले जाते.
सध्याचे सरकार बदलण्यासाठी लोक जास्त मतदान करतात, असे मानले जाते. उच्च मतदान टक्केवारी हे सरकार बदलाचे समानार्थी मानले जाते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये हा कल बदलला आहे.