देशातील युवकांना कंपनी, आस्थापने मध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसुचित केलेली आहेत.
या आस्थापनांमध्ये करता येईल इंटर्नशीप
बजाज फायनान्स लि., बायर क्रॉपसायन्सं लि., डाबर इंडिया लि., गोदरेज कंज्युमर कोड लि., एच.डी.एफ.सी. बँक लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., इंड्युसंड बँक लि. , ज्युब्लीयंट फूडवर्कस लि., राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर लि., रिलायंन्स इंडस्ट्रीज लि., श्रीराम फायनान्स लि., टाटा ए.आय.जी. जनरल इंन्शुरंन्स कंपनी लि. या नामांकीत कंपनी, आस्थापना यांनी http://pminternship.mca.gov.in/
या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसूचित केलेली आहेत. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 24 पर्यंत असावे व दहावी, बारावी, पदवीधर, आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
असा करा अर्ज
या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/
या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी. त्यानंतर विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिपचा लाभ घेता येईल, तसेच या सोबतच त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल, या शिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एकरकमी अनुदान मिळेल.
या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल. या योजनेचा दहावी, बारावी, पदवीधर, आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रतेचे जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना असा करा अर्ज
Leave a comment
Leave a comment