महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या जागेवर शिवसेना किंवा भाजप उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे.विनोद पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत. तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विनोद पाटील हे संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे.
विनोद पाटील छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक
Leave a comment
Leave a comment