लातूर लोकसभा मतदारसंघातील व महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी शुक्रवारी लातूरात लक्षवेधी विशाल मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर त्यांच्या प्रचाराची शुभारंभ सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.
सभेला काँग्रेस पक्षाचे नेते खासदार चंद्रकात हंडोरे, अ ा बाळासाहेब थाेरात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, साहित्सरत्न अण्णा भाऊ साठे यांचे पणतू सचिन साठे, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील अन्य नेते मंउळी हजर हाेती