सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा निधी बंद करून तो निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच केला होता. या प्रश्नाच्या संदर्भात सरकारच्या वतीने खुलासा करताना भातखळकरांनी वरील बाब सांगितले. त्याच अनुषंगाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी थांबवण्यात आला नाही, थांबू दिला जाणार नाही असा खुलासा आज केला आहे
