
भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये स्वत: लक्ष घातले. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे. मला सरकारमधून मोकळे करावे, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला १९ जागांवरच समाधान मानावे लागले.