निवडणूक लढविण्याबाबत महिलांची उदासीनता कायम असून सहाव्या फेरीत एकूण ९२ म्हणजे केवळ ११ टक्के महिला उमेदवार आहेत.
एडीआरच्या माहितीनुसार सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणा-या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. या टप्प्यात २७१ उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. १८० उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे म्हटले, त्यातील १४१ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. १२ जण गुन्हेगारी खटल्यांत दोषी सिद्ध झाले आहेत. सहा जणांविरुद्ध हत्येचे व २१ जणांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे आहेत. २४ उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत व त्यातील तिघांवर बलात्काराचे गुन्हे आहेत. द्वेषपूर्ण भाषणे करणा-या १६ जणांवरही गुन्हे दाखल आहेत.
सहाव्या टप्प्यात भाजपचे सर्वाधिक ४८ उमेदवार कोट्यधीश आहेत. दुस-या क्रमांकावरील काँग्रेसच्या २० उमेदवारांनीही आपल्याकडे किमान एक कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६ कोटी २१ लाख रुपयांची संपत्ती आहे. जिंदाल यांच्या पाठोपाठ ओडिशाच्या कटकचे बिजद उमेदवार सत्राप्त (४८२ कोटी) यांचा क्रमांक आहे.