श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था खडकी घाट तालुका जिल्हा बीड या संस्थेत गत वीस वर्षापासून वाद होते त्यामुळे या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांचा विकास खुंटला होता. श्री बंकट स्वामी यांच्या आशीर्वादानेच सुरू असलेली न्यायालय लढाई मला जिंकता आली असे उद्गार श्री बंकट स्वामी शिक्षण संस्थेचे नूतन सचिव श्री घरात मच्छिंद्र यांनी व्यक्त केले. ते वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते याप्रसंगी श्री बंकट स्वामी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य गणेश पोकळे, कोषाध्यक्ष श्री मुंढे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिक्षण संस्थेला उभारी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी दिले. वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील प्रा. शिवशंकर पटवारी प्रा. सुहास गाढवे प्रा. राजश्री महाजन प्रा. भूषण मठपती प्रा. ओंकार देशमुख यांच्यासह दिपक जाधव, इमरान पठाण, सचिन चौरे आणि श्रीमती संध्या खोसे हे उपस्थित होते
Discussion about this post