
राज्यात मान्सूनपूर्व कामांसोबतच शालेय शिक्षण विभागाची तयारी आणि इतर कामांसाठी आचारसंहितेचे काही नियम शिथिल करावेत, या संदर्भात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे.
या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता मंत्रालयातील सूत्रांकडून वर्तविण्यात आली. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले होते.
देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. राज्यात सर्व मतदारसंघांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असली,
तरी अद्याप आचारसंहिता कायम आहे. परिणामी, राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मदतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.