मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई सामाजिक आहे, राजकीय नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग न घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले.
या मतदारसंघात मराठा समाजाने आपणास पाठींबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरु केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत. विरोधकांचे हे गैरप्रकार मराठा समाजाने हाणून पाडावेत विरोधकांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही केले.परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची पाथरीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आदी उपस्थित होते.
Discussion about this post