एकनाथ शिंदे यांनी रविवारी (२१ एप्रिल) टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रकांत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या अटकेबाबतच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मला त्याबाबत अशी माहिती आहे की, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मविआ सरकारने काही खटले दाखल करून या लोकांना अटक केली असती. तसेच २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचाही कट त्यांनी (मविआने) रचला होता.
महाविकास आघाडीचं सरकार असताना आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. तेव्हा मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या ३३ महिन्यांच्या काळात आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे.