By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > राज्य > निष्ठा,समर्पण,समाजसेवेचे प्रतिक: मा श्री रमेशभाऊ पोकळे
राज्य

निष्ठा,समर्पण,समाजसेवेचे प्रतिक: मा श्री रमेशभाऊ पोकळे

Beedlive Team
Last updated: May 28, 2026 7:14 pm
By Beedlive Team
Share
5 Min Read
SHARE

समाजातील काही कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची ओळख ही केवळ त्यांच्या पदांमुळे किंवा व्यवसायामुळे निर्माण होत नाही; तर ती त्यांच्या लोकांशी जोडलेल्या नात्यामुळे, सार्वजनिक कार्यातील सहभागामुळे आणि काळानुसार स्वीकारलेल्या विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे घडत असते. रमेशभाऊ पोकळे यांचा प्रवास हा अशाच लोकाभिमुख नेतृत्वाचा आणि विकासाच्या नव्या अध्यायाचा प्रवास म्हणून पाहिला जातो.

 

बीड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि संस्थात्मक कार्यातून उभा राहिलेला त्यांचा सार्वजनिक संवाद हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा आधार राहिला आहे. विविध उपक्रम, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि समाजातील सर्व स्तरांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची त्यांची भूमिका यामुळे त्यांची ओळख केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही. राजकारण, शिक्षण, समाजकारण आणि आता रियल इस्टेट क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे रमेशभाऊ पोकळे आज आपल्या आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करत आहेत. रमेशभाऊ यांनी आपल्या कार्यातून बीड जिल्ह्यात प्रभावी राजकीय आणि सामाजिक नेतृत्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे, सचोटीने आणि चिकाटीने कार्य करत यश संपादन केले. त्यांच्या कार्यामागे नेहमीच निष्ठा, समर्पण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.

भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करताना त्यांनी केंद्रीय मंत्री लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि हजारो कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभी केली. संघटन कौशल्य, प्रभावी संवादशैली आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांचे नेतृत्व वेगळ्या उंचीवर पोहोचले.

राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी समाजकारणाचे भान कधीही सोडले नाही. म्हणूनच त्यांच्या राजकीय प्रवासात समाजहिताची भूमिका सातत्याने दिसून येते. कार्यकर्त्यांच्या भावना आणि नात्यांना नेहमी प्राधान्य देणाऱ्या रमेशभाऊंनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आपली स्वतंत्र राजकीय भूमिका देखील अधोरेखित केली होती.

भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. शेतकरी, ग्रामीण भाग आणि सामाजिक प्रश्नांशी असलेली त्यांची नाळ कायम घट्ट राहिली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. २०२४ मध्ये बीड विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी देण्याची मागणीही अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांकडून करण्यात आली होती. यावरून त्यांच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.

रमेशभाऊंचा शिक्षण क्षेत्राशी असलेला संबंध विशेष उल्लेखनीय आहे. स्वतः अत्यंत सामान्य परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या रमेशभाऊंना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष काम उभे केले. कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बीडमध्ये विविध व्यावसायिक महाविद्यालयांची स्थापना केली. या महाविद्यालयांमुळे शेकडो विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.

बीडसारख्या मागास जिल्ह्यात व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणे हे केवळ संस्थात्मक कार्य नव्हते, तर ते सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण होते. अनेक विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर आणि स्वावलंबनाचा मार्ग या माध्यमातून मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा त्यामागील मूळ विचार होता.

रमेशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा माणुसकीचा स्वभाव. शांत, संयमी, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारी त्यांची कार्यशैली आजही लोकांना आकर्षित करते. कोणत्याही व्यक्तीशी आदराने संवाद साधणे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणे आणि संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे ही त्यांची ओळख राहिली आहे.

कुटुंबीय मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समतोल त्यांच्या आयुष्यात दिसून येतो. त्यांचे बंधू रामदास पोकळे आणि प्रा. गणेश पोकळे हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. कुटुंबातील परस्पर जिव्हाळा आणि समाजाभिमुख विचारसरणी ही त्यांच्या घरातील संस्कारांची साक्ष देणारी आहे.

सक्रिय राजकारणातून काहीसे दूर होत त्यांनी पुणे येथे रियल इस्टेट क्षेत्रात कार्य सुरू केले. आज ते या क्षेत्रात विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण काम करणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभारून अनेक कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम त्यांनी केले आहे. विकास, गुणवत्ता आणि विश्वास या तत्त्वांवर आधारित त्यांची कार्यपद्धती या क्षेत्रातही दिसून येते.आज त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यप्रवासाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—रमेशभाऊ पोकळे हे केवळ राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व नाही, तर संघर्षातून उभे राहून समाजाशी नाते जपणारे, लोकांना जोडणारे आणि विकासाची सकारात्मक दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

त्यांच्या पुढील आयुष्यातही समाजहिताचे, विकासाचे आणि प्रेरणादायी कार्य अधिक व्यापक होत राहो, हीच शुभेच्छा.

शांत, संयमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास ५० व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा शिवशंकर पटवारी

💐💐💐💐💐

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

राज्य

डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा

By Beedlive Team
राज्य

संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व : मनोजदादा जरांगे पाटील

By Beedlive Team
राज्य

वारसा जपणारा संवेदनशील लोकनेता- विक्रम वसंतराव काळे

By Beedlive Team
राज्य

एस टी तर्फे विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?