
पतंजली आयुर्वेदाच्या नावाने दिशाभूल करत असल्याचा प्रकार सर्वोच्च न्यायालयात उघडकीस आल्यानंतर उत्तराखंड सरकारने पतंजली ची 14 उत्पादने विकण्यास बंदी केली आहे. या उत्पादनामध्ये स्वासारी गोल्ड, श्वासारी वटी, ब्रोकोम, स्वासारी प्रवाही, स्वासारी अवलेह, मुक्त वटी, एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधु ग्रिट, मधु नाशिनी अशा काही औषधांचा त्यात समावेश आहे. यावरील उत्पादनाचे बाजारात विक्री करणे त्याची निर्मिती करणे यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे ही कारवाई उत्तराखंड सरकारच्या औषधी विभागाने केली होती यात अनेक कायद्याचं उल्लंघन झाल्याचे देखील आढळल आहे