महाराष्ट्राच्या भूमीने अनेक थोर समाजसुधारक, क्रांतिकारक, साहित्यिक आणि विचारवंत दिले आहेत. या महान परंपरांचे दर्शन घडवणारी १ ऑगस्ट ही तारीख अत्यंत संस्मरणीय आहे. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय जागृतीचा शंखनाद करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, तर दुसऱ्या बाजूला उपेक्षितांच्या वेदनांना आपल्या ओघवत्या शाहिरी व लेखणीतून वाचा फोडणारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या दोन्ही महापुरुषांचे विचार आपल्याला आजही प्रेरणा देतात असे विचार कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा गणेश पोकळे यांनी व्यक्त केले.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय आणि संभाजीराजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रप्राचार्य बप्पासाहेब हावळे, प्राचार्या कोमल सुरवसे, प्रा अफरोज सय्यद,प्रा सुहासा गाढवे, श्री जाधव दिपक,श्री कदम,श्री शंकर इंगोले,श्रीती संध्या खोसे,सचिन चौरे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपसिथत होते.