By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > राज्य > एस टी तर्फे विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड
राज्य

एस टी तर्फे विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड

Beedlive Team
Last updated: June 20, 2026 8:54 am
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींसाठी आता आधारकार्ड संलग्न ‘एनसीएमसी अनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येत आहे. लवकरच शालेय व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासेसकरिताही या कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्ड देण्याची कार्यवाही सर्व आगारांमध्ये सुरू आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याच धर्तीवर आता नजीकच्या काळात विद्यार्थ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.

शालेय, शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक संलग्न एनसीएमसी कार्ड प्राप्त होणार आहे. यासाठी हे दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासाकरिता लागणाऱ्या या स्मार्ट कार्डचा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अर्जात नमूद केलेली माहिती व जोडलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असून, त्यानंतरच हा अर्ज आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत एजंट यांच्याकडे जमा करावयाचा आहे. या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा चालू मोबाईल (भ्रमणध्वनी) क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अर्जाची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पावती दिली जाईल. नोंदणी पूर्ण झालेले हे एनसीएमसी कार्ड ३० दिवसांच्या आत प्रिंट करून संबंधित आगारास प्राप्त होईल आणि त्यानंतर आगारामध्ये पॉस (पीओएस) मशिनद्वारे हे कार्ड ॲक्टिव्ह करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. तरी सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

राज्य

डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा

By Beedlive Team
राज्य

संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व : मनोजदादा जरांगे पाटील

By Beedlive Team
राज्य

वारसा जपणारा संवेदनशील लोकनेता- विक्रम वसंतराव काळे

By Beedlive Team
राज्य

निष्ठा,समर्पण,समाजसेवेचे प्रतिक: मा श्री रमेशभाऊ पोकळे

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?