बीड दिं. ( प्रतिनीधी) येथिल वंसतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय,बीड येथे उद्या दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता राष्ट्रीय महिला आयोग आणि युवा मंथन च्या सहकार्याने लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनीची उपस्थिती अनिवार्य असून या कार्यशाळेत लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षे विषयी सविस्त्रर माहिती दिली जाणार आहे. ही कार्यशाळा राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजित केली आहे. कार्यशाळेत लैगिंग समानता या विष्यावर आणि सायबर सुरक्षेवर माहिती दिली जाणार असून त्याची काही प्रात्यक्षिके सादर केली जातील.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व विद्याथ्याानी उपस्थित राहवे असे आवाहन प्राचार्य आर डी सय्यद,प्रा शिवशंकर पटवारी, प्रा बप्पसाहेब हावळे,प्राचार्या कोमल सुरवसे,प्रा सुहास गाढवे,प्रा सय्यद ए आर, प्रा रसाळ ए बी आदींनी केले आहेृ