बीड शिक्षणातून सुस्कृंत समाजाची निर्मिती झाली तरच संपूर्ण राष्ट्राचा विकास साध्य होवू शकतो आणि राष्ट्राच्या विकासाला शिव,शाहू,फुले आंबेडकर यांचे समातावादी विचारांने चालना मिळू शकते असे विचार ह.भ.प. संभाजी महाराज( श्री नगदनारायण संस्थान) यांनी व्यक्त केले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यातच महाराष्ट्राची पायाभरणी होती म्हणूनच महाराष्ट् हे समतावादी विचाराचे राज्य म्हणून ओळखले जाते असे विचार कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक मा श्री रमेशभाऊ पोकळे यांनी व्यक्त केले.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय आणि संभाजीराजे ग्रंथालय आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय,बीडच्या वतीने आयोजित राजमाता मॉसाहेब जीजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यकमात ते अध्यक्षिय समारोप प्रसंगी बोलत होते. कार्यकमास प्रमुख् अतिथी म्हणून ह.भ.प. संभाजी महाराज, नारायणजी बहिर,हनुमानजी मुळीक,रवि शिंदे ,सचिव प्रा गणेशजी पोकळे,प्र प्राचार्य आर डी सय्यद यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ह.भ.प. संभाजी महाराज यांनी, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक हित जोपासण्यासाठी सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जोपासल्या तरच पत्रकारितेच्या अंतीम ध्येयापर्यंत पोहचता येते असे सांगून जगातील कोणताही धर्म हा इतर कोणत्याही धर्माला कमी लेखत नसतो, मोठे कार्य करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वैश्विक कल्याणाचा विचार प्रदान करतात असे विचार व्यक्त केले.
मा श्री रमेशभाऊ पोकळे यांनी,महापुरुषांच्या विचाराने,आचाराने विद्यार्थी घडला पाहिजेत तरच नैतिक अधिष्ठानावर आधारीत समाजनिर्मिती होवू भौतिक प्रगतीबरोबरच नैतिक समाज निर्माण होवू शकतो असे सांगून महापूरुषांच्या विचाराला नव्हे तर महापुरुषांच्याच वाटण्या समाजाने आपसात केल्या असल्याची खंत देखिल त्यांनी यावेळी व्यक्त केली..
कार्यक्रमाच्या सुरुवातील राजमात मॉसाहेब जीजाऊ ,स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक प्रा बप्पासाहेब हावळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा शिवशंकर पटवारी यांनी तर उपस्थितांचे आभार संस्था सचिव प्रा गणेश पोकळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.