
१२ ऑक्टोबर —
हा दिवस गणेश शिवदासराव पोकळे यांच्यासाठी केवळ वाढदिवसाचा नाही, तर त्यांच्या जीवन प्रवासाचा पुनरावलोकन करण्याचा दिवस आहे. वाढदिवस म्हणजे फक्त वयाची भर नाही, तर अनुभवांचे संचित आणि नव्या संकल्पांची सुरुवात.
गणेश पोकळे यांचा प्रवास पाहिला तर त्यात संघर्ष आहे, कष्ट आहेत, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि कुटुंबाचा आधार आहे. जीवन जगण्याची त्यांचा साधेपणा , निर्मळ मनाचा सच्चा व्यक्ती, शिक्षक म्हणून केलेली सेवा, संगणक साक्षरतेचा प्रसार, शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व आणि व्यवसायातील यश – या सर्व टप्प्यांमध्ये त्यांची जिद्द आणि प्रामाणिकता सातत्याने दिसून येतो.
गणेश पोकळे यांचा जन्म एका साध्या पण संस्कारसंपन्न कुटुंबात झाला. आई आंजुबाई पोकळे यांनी ममतेसोबत सहनशीलता, त्याग आणि संयम यांची शिकवण दिली. वडील शिवदासराव पोकळे यांनी कष्ट आणि प्रामाणिकतेचे बीज मनात पेरले. यामुळे त्यांच्या जीवनात उत्तम संस्कारांची भक्कम पायाभरणी झाली.
भाऊ रमेशभाऊ यांच्या सारखा सर्वगुणसंपन्न, हिमालयाची उंची असणारे परंतु अतिशय नम्र स्वाभाव आणि अफाट दुरदृष्टी असणारे मार्गदर्शक भाऊ तसेच रामदास हे देखील प्रत्येक प्रसंगात खंबारपणे सतत पाठीशी उभे असतात. या दोन्ही भावांच्या गणेशरावांच्या पाठीशी असणा-या आशिर्वादाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नेहमीच खंबीरपणे साथ दिली. तर पत्नी स्वाती पोकळे यांनी प्रत्येक टप्प्यावर सहकार्य, प्रेरणा आणि विश्वासाचा आधार दिला.
त्यांच्या प्रवासाचा पाया म्हणजे “कुटुंबीयांचे प्रेम आणि आशीर्वाद”.
शैक्षणिक प्रवास
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
१९८७–१९९१ दरम्यान पाटोदा येथील क्रांतीनगर शाळा येथे घेतले. गाढे सर यांनी ज्ञानाचे पहिले धडे दिले.
१९९१–१९९५ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद शाळा, पाटोदा येथे माध्यमिक शिक्षण घेतले. येथे धसे मॅडम, पाचांळ मॅडम, धट मॅडम, डिडूळ सर, लाड सर, शिंदे सर, मरे सर, वारभुवनकर सर, वराट सर, मोराळे सर आणि घट्ट सर यांसारख्या गुरुजनांनी त्यांच्यावर शैक्षणिक व चारित्र्याचे संस्कार केले.
दहावी व महाविद्यालयीन टप्पा
१९९५–९६ मध्ये बापुजी सांळूखे हायस्कूल, बीड येथे त्यांनी दहावी पूर्ण केली. येथे गिरी सर, माने सर, सावंत सर यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर १९९६–९८ या काळात केसरबाई क्षीरसागर महाविद्यालय, बीड येथे कला शाखेतून ११ वी–१२ वी पूर्ण केली. येथे प्रा. सतेद्र पाटील, प्रा. घाडगे, प्रा. मोराळे आणि प्रा. गाडवे या प्राध्यापकांनी त्यांना विचारांची सखोल दृष्टी दिली.
व्यावसायिक व बी.एड. शिक्षण
१२ वी नंतर त्यांनी आयटीआय, बीड येथे DTPO कोर्स पूर्ण केला.
येथे झुबेरी मॅडम, मुजीब सर आणि कादंबरी सर यांनी संगणक शिक्षणाचे धडे दिले. कागल येथे बी.एड. करताना लकडे मॅडम, घाटगे सर, पवार सर, पाटील मॅडम आणि गायकवाड मॅडम यांनी “शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात उमेद रुजवणारा असतो” हा धडा दिला. उच्च शिक्षण घेत असताना प्रमिल्ला देवी पाटील महाविद्यालय नेकनूर प्राचार्य डॉ दत्तात्रय ढास,प्रा.जाधव,प्रा.मुजावर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षक म्हणून कार्य
२००९–२०१४ या काळात त्यांनी तिरुपती आश्रम शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय, वसंत तांडा, पाचेगाव येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले.
येथे संस्थाचालक राठोड गुरुजी, गोरक्षनाथ राठोड, मुख्याध्यापक दाभाडे सर, थापडे सर तसेच सहकारी राठोड सर, घुंगरड सर, कानडे सर, नागरगोजे सर यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
या काळात गणेश पोकळे हे फक्त शिक्षक नव्हते; ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आत्मविश्वास जागवणारे गुरू होते.
संगणक साक्षरतेची वाटचाल
२००१ मध्ये चौसाळा येथे त्यांनी गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली.
त्या काळात संगणक ग्रामीण भागासाठी अजूनही अनोळखी होता. परंतु त्यांच्या गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट माध्यमातून या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी संगणक साक्षर झाले.
या प्रवासात एमकेसीएल (Maharashtra Knowledge Corporation Limited) या संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरले.
समन्वयक बालकिशन बलदावा सर यांनी गणेशरावांना संगणक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचा सल्ला दिला. त्यांनी व्यवसायीक अडचणी समजावून सांगत त्यांना आत्मविश्वास दिला.
बलदावा सरांचे हे मार्गदर्शन हा गणेशरावांच्या संगणक व्यवसायाचा पहिला पायरी होती.
आज त्यांचे शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तुंग भरारी घेतली आहे.
शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व
गणेश पोकळे आज कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत –
• वसंतराव काळे महाविद्यालय, बीड
• संभाजी राजे ग्रंथालयशास्त्र महाविद्यालय, बीड
• महात्मा ज्योतीबा फुले संगणकशास्त्र महाविद्यालय, चौसाळा
• न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, नेकनूर
या शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान व जीवनमूल्यांची जोड देत आहेत.
व्यवसायातील टप्पा
ओम साई इन्फ्राच्या माध्यमातून त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकले.
मोठे भाऊ रमेशभाऊ, गुरुवर्य हावळे सर, तेजसजी शिंदे साहेब आणि इंजिनिअर घोडके साहेब यांनी त्यांना व्यवसायातील खाचखळगे समजावले. “चुकलात तरी आम्ही आहोत” या भावनेने त्यांनी आधार दिला.
आज गणेश पोकळे ते व्यावसायात उत्तुंग भरारी घेत आहेत.
वाढदिवसाची जाणीव
१२ ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या दृष्टीने कृतज्ञतेचा दिवस आहे.
आई-वडिलांचे संस्कार, पत्नी स्वातीताई यांचा सहकार्यभाव, भाऊ रमेशभाऊ व रामदास यांचा आधार, गुरुजनांचे मार्गदर्शन, मित्रांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या सर्वांनी मिळूनच आजचे गणेश पोकळे घडवले आहेत.
गणेश शिवदासराव पोकळे यांचा जीवनप्रवास हा एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीवरून आलेला एक तरुण कष्ट, प्रामाणिकपणा, मार्गदर्शन आणि कुटुंबाचा आधार यांच्या बळावर शिक्षक, शैक्षणिक संकुलाचे सचिव आणि व्यवसायातील प्रामाणिक उद्योजक झाला.
ते म्हणतात
“स्वप्ने मोठी ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा, गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या आणि कुटुंबाचा आधार जपा – मग यश तुमच्या पावलांशी चालत येईल.
गणेश सर तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा – तुमच्या मनातील सर्व स्वप्न पुर्ण व्हावेत, तुमच्या प्रगतीचा आलेख असाच उंच-उंच जावो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
प्रा.बाप्पासाहेब हावळे