By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > मोसमी पाऊस कोकणात दाखल; वाटचालीसाठी दोन दिवस पोषक स्थिती
Uncategorized

मोसमी पाऊस कोकणात दाखल; वाटचालीसाठी दोन दिवस पोषक स्थिती

Beedlive Team
Last updated: June 12, 2023 3:09 am
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर रविवारी कोकणात दाखल झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वारे दाखल झाले असून पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे आणि सकाळी हलक्या सरींचा शिडकावा झाला. किनारपट्टीवर ढगांची दाटी असून, वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे. कर्नाटकातील शिवमोगा, हसनपर्यंत आणि केरळमधील श्रीहरीकोटा, तमिळनाडूतील धर्मपुरी, आसाममधील धुब्रीपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस ७ जूनला दाखल होतो. यंदा तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. केरळमध्येच तो उशिराने म्हणजे ७ जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी अवघ्या चारच दिवसांत रत्नागिरीत हजेरी लावली आहे.

राज्यात अन्यत्र पूर्वमोसमीचा इशारा

राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस सोसाटय़ाचा वारा वाहून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा कच्छला तडाखा बसण्याची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ यापूर्वी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. पण, आता चक्रीवादळाने दिशा बदलली आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. गुरुवारी, पंधरा जून रोजी दुपारी चक्रीवादळ कच्छ आणि कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या चक्रीवादळ कच्छच्या वायव्येस अरबी समुद्रात ६१० किलोमीटर आहे.

गुजरातच्या किनारपट्टीवर सोमवारी सुमारे पन्नास किलोमीटर प्रती तास, मंगळवार आणि बुधवारी सुमारे सत्तर किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहू शकते. गुरुवारी वाऱ्याचा वेग ७५ किलोमीटर प्रती तासांवर जाऊ शकतो. पुढील चार दिवस मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये.

अंदाज काय? मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पुढील ४८ तास पोषक वातावरण आहे. दोन दिवसांत संपूर्ण तळकोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांत मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहील, असा अंदाज आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?