भारतीय जनता पार्टी आणि एनडीए मध्ये सहभागी असणाऱ्या घटक पक्षांचे बैठक आज संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये पार पडली. या बैठकीत एनडीए घटक दलाचे चंद्रबाबू नायडू यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व खासदार आणि देशभरातील बीजेपी चे मान्यवर नेते उपस्थित होते.
या बैठकीत माझी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्रजी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्यास माजी गृहमंत्री अमित शहा, मा नितीन गडकरी यांच्यासह अनेकनी अनुमोदन देऊन सर्वानुमते नरेंद्रजी मोदी यांच्या नावाची संसदीय दल प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली.