
धाराशिव तालुक्यातील कावलदरा राष्ट्रीय महामार्गालगत बिबट्या दिसून आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी रात्री उशिरा भेट देवून परिसराची पाहणी करत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी तसेच गावातील रहिवासी यांनी सावध राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी देखिल धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे .तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे व वासरे या बिबट्याने फाडल्याच्या घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.